संस्थापक-संपादक : राजेश जोष्टे, देशातील पहिले सुवर्ण (गोल्ड मेडल) पदक विजेते पत्रकार

चिपळूण येथील मिलिंद मनोहर चितळे यांनी समाजसेवेचा आदर्शवत वारसा जपत आज ९६वे रक्तदान करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असताना त्यांनी आपल्या नोकरीसोबतच मोडी लिपीचे अध्ययन केले. तसेच दासबोध आणि मनाचे श्लोक या ग्रंथांचा सखोल अभ्यास करून संबंधित अभ्यासक्रमही यशस्वीरीत्या पूर्ण केले.

ज्ञानसाधना आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम साधत त्यांनी आतापर्यंत तब्बल ९६ वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

त्यांचे आगामी १००वे रक्तदान भव्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साजरे व्हावे आणि त्यांच्या कार्यातून अधिकाधिक नागरिकांना रक्तदानाची प्रेरणा मिळावी, हीच सदिच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *