संस्थापक-संपादक : राजेश जोष्टे, देशातील पहिले सुवर्ण (गोल्ड मेडल) पदक विजेते पत्रकार

कामोठे (प्रतिनिधी) : महाड येथील सुहास मस्के यांची ११ वर्षीय कन्या अवनी मस्के हिच्यावर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू असून, तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र वाहतूक समिती आणि भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली.

यावेळी शिष्टमंडळाने अवनीवर उपचार करणारे डॉ. गव्हाणे यांची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच एमजीएम हॉस्पिटलचे संचालक सुधीर कदम यांचीही भेट घेऊन अवनीवर सुरू असलेल्या उपचारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रुग्णाला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी आणि कुटुंबीयांना आवश्यक ते सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

अवनीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करत शिष्टमंडळाने मस्के कुटुंबीयांना धीर दिला आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी रायगड जिल्हा भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष रवी नाईक, उपेंद्र मराठे, मधुकर उरणकर, राजपाल शेगोकार, श्याम भगत, बाळाराम पाटील आणि अभिमन्यू पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *